महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने : संजय राऊतांचं खळबळजनक ट्विट

sanjay-raut-with-uddhav-thackeray

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या शक्तीशाली प्रदर्शनापुढे आणि त्यांना असलेल्या आमदारांच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर काहीही पर्याय उरलेला नाहीय. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे आता लक्ष ठेवून राहायचं, असं मुख्यमंत्र्यांचं ठरलेलं असतानाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचं प्लॅन फोडणारं ट्विट केलं आहे.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरु आहे, असं ट्विट राऊतांनी केलं आहे. म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याचे संकेतच संजय राऊतांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला तर संपूर्ण मंत्रिमंडळच बरखास्त होईल.

शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी सुरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मात्र, या चर्चेतून अद्याप कोणताही मार्ग निघाला नसून चर्चा निष्फळ ठरल्याचं दिसत आहे.

त्यानंतर आता एकनाथ शिंदे शिवसेनेचे ३३ तर अपक्ष सात अशा एकूण ४० आमदारांना सोबत घेऊन सुरतहून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचले आहे. या आमदारांना रात्रीच चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे एअर लिफ्ट करण्यात आलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी आमच्याकडे बहुमत असल्याचे म्हटले असून शिवसेनेने निवडलेला गटनेता हा घटनाबाह्य असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here