पुणे (नारायण शेळके) – पुणे सोलापूर रोडने लोणीकाळभोर हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून बोरीभडक फाटा येथे एल.सी.बी.च्या टीमने तुकाराम उर्फ नांजी सखाराम बडदे (वय२३, रा.कोडीत, ता.पुरंदर, जि.पुणे) याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या कंबरेला सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तुल व अंदाजे ५०० रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस आढळून आले.
आरोपीची वैद्यकिय तापसणी करून त्याला यवत पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या आरोपीवर यापूर्वीदेखील ५ गुन्हे दाखल असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे, सहाय्यक फौजदार शब्बीर पठाण, पोलीस हवालदार इनामदार, पोलीस नाइक विजय कांचन, लियाकत मुजावर, गुरु जाधव, पोलीस शिपाई धीरज जाधव, मंगेश भगत, अमोल शेडगे, सुधीर अहिवळे यांनी केलेली आहे.






