पालघर – कोविड 19 म्हणजे (कोरोना) साथीच्या रोगाच्या प्रसार झपाट्याने वाढत आहे. एक हात मदतीचा ह्या कार्यक्रमा अंतर्गत आज आपल्या महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन(पालघर) आणि अस्तित्व प्रतिष्ठान संस्थेकडून विरार येथे आयुष मंत्रालय ने सुचविलेल्या आर्सेनिक ३० होमिओपॅथी मेडीसीनच्या ४० गोळ्या असलेल्या १०००/ बोटल चे फ्री वितरण करण्यात येणार आहे.आणि नागरिकांना मेडीसिन कसे घ्यायचे आहे तेही सांगण्यात येणार आहे. महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन(महाराष्ट्र राज्य) मा.श्री.रवि वैद्य साहेब (संस्थापक अध्यक्ष) मा.श्री.सिद्धार्थ जाधव साहेब (प्रदेशाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य) आणि मा.श्री.धीरज पारसेकर साहेब (निवड समिती अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य) ह्याच्या आदेशानुसार आम्ही महाराष्ट्र पोलीस बॉइज असोसिएशन( पालघर जिल्हा) टीमतर्फे हे सामाजिक कार्य हाती घेण्यात आले आहे.
या मोफत औषध वितरणासाठी दिपक मनोहर गोसावी (पालघर जिल्हा अध्यक्ष)/ निशा फाटक (पालघर जिल्हा महिला अध्यक्षा) भावना रांभिया (समाजसेविका) ह्यांचा प्रयत्नाने १०००/ मेडिसिन (बोटल) मिळाल्या होत्या. त्यातील १५० बोटल युथ २४ संस्थेचे समाज सेवक (पत्रकार)श्री.अजय वर्मा साहेब ह्यांना गरजूंना वाटण्यासाठी आपल्या पालघर जन संपर्क कार्यालयाकडून देण्यात आल्या.
परिसरातील गरजु व्यक्तींना शक्य होईल तेवढी मदत करावी व दररोज १००० ते १२०० गरजूची जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी आपली आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या. सुरक्षित रहा, घरात रहा, कोरोना विरूद्ध ची लढाई आपण नक्की जिंकूच, असे आवाहन महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.






