मुक्ताईनगर येथे तीन कोरोना बाधितांच्या संपर्कातील 29 जणांचे घेतले स्वॅब

मुक्ताईनगर : शहरातील तिघांचा सोमवारी दि 15 जून रोजी कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त होताच आरोग्य विभागाने तातडीने शहरातील तीन ठिकाणी कंटेंटमेन्ट झोन तयार करून बाधितांच्या संपर्कातील तब्बल 29 जणांचे स्वॅब घेतले असून ते पुढील तपासणीसाठी जळगांव येथे रवाना करण्यात आले अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ निलेश पाटील यांनी दिली .
शहरातील भुसावळरोड , तहसिलरोड व जुने गावातील मढी असे तिन्ही ठिकाणचे रहिवासी असलेले तिघेही कोरोना बाधीत आढळल्याने तहसीलदारांच्या आदेशाने नगरपंचायत प्रशासनाने या तिन्ही ठिकाणी कंटेनमेंट झोन तयार करीत परिसर सील केला . तसेच पालिकेचे मुख्याधिकारी विक्रम जगदाळे व नगराध्यक्षा नजमा तडवी यांच्या उपस्थितीत निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली .
मुक्ताईनगर शहरातील भिल्लवाडीतील 3 व वरणगाव येथे बाधीत आढलेल्या पोलिसाची चार वर्षीय कन्या असे रुग्णांवर उपचार सुरू होते .परंतु सोमवारी दि 15 जून रोजी पुन्हा तिघांचा अहवाल कोरोना पॉसीटिव्ह आल्याने आता एकूण सात कोरोना बाधीत रुग्ण मुक्ताईनगर येथे ॲक्टिव्ह आहेत . यापैकी एक रुग्णांला इतर व्याधी असल्याने त्याला पुढील उपचारार्थ जळगांव कोविड हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे तर उर्वरित सहा बाधीत रुग्णांवर मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. जि प समाज कल्याण सभापती यांचे सह त्यांचे कुटुंबातील सहा व एक खासगी डॉक्टर अशा एकूण सात जणांनी कोरोना वर मात करून ते स्वगृही परतलेले आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here