कर्वेरस्त्यावर वृद्धाला नाल्यात ढकलून सोनसाखळी हिसकावली

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : वृध्दाच्या अंगावर उडी मारून त्यांना नाल्यात ढकलून देत गळ्यातील दीड लाखांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना मंगळवारी दुपारी कर्वेरस्त्यावरील मृत्यूंजयेश्वर मंदिराजवळ घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारदार हे कोथरुडमधील मृत्युंजयेश्वर मंदिर परिसरात राहायला आहेत. मंगळवारी दुपारच्या सुमारास ते कर्वे रस्त्याच्या बाजूला थांबले होते. त्यावेळी आलेल्या चोरट्यांनी त्यांना धक्का देऊन नाल्यात पाडले. त्यांच्या गळ्यातील दीड लाखांची सोन्याची साखळी हिसकावून नेली. त्यांनी आरडाओरडा करेपर्यंत चोरटे पसार झाला होते.

दरम्यान, परिसरातून जाणारे नागेशकुमार नलावडे आणि टेम्पो चालकांला घटना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कोथरूड पोलिसांसह अग्निशमन दलाने धाव घेत या वृध्दाची सुटका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here