दिल्ली : टीम इंडिया व इंग्लंडमधील टेस्ट सिरीजच्या अखेरच्या सामन्याआधी टीम इंडियाचा फलंदाज विराट कोहली कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर केलेल्या कोरोना चाचणीत त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
विराट व त्याची पत्नी अनुष्का हे मालदिवला फिरायला दगेले होते. तेथून विराट थेट इंग्लंडला पाचवा कसोटी सामना खेळण्यासाठी पोहोचला. मात्र तिथे पोहचताच त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आता तो इंग्लड विरोधातील अखेरचा सामना खेळू शकणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
इंग्लंड व टीम इंडियामधील पाचवा सामना हा १ ते ५ जुलै दरम्यान इंग्लंडमधील बर्मिंगहम येथील एजबस्टन मैदानावर खेळवला जाणार आहे. ही मालिका गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात खेळवली गेली होती. मात्र त्यावेळी कोरोना मोठ्या प्रमाणात वाढल्याने या मालिकेचा शेवटचा सामना पुढे ढकलण्यात आला होता. या मालिकेत टीम इंडिया २-१ ने आघाडीवर आहे.






