एरंडोल तालुक्यात जेवण न बनविल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा खून

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : जेवण न बनविल्याच्या रागातून पत्नीला लाकडी काठीने जबर मारहाण करून खून केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आलाय. ही एरंडोल तालुक्यातील जावखेडा येथे उघडीस आली आहे. या प्रकरणी आरोपी पती विरुद्द एरंडोल पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

मयत बुरकीबाई बाळू बारेला (वय ३०) या एरंडोल तालुक्यातील जावखेडा येथे वास्तव्यास होत्या. आरोपी पती बाळू बारेला रा.झापडीमाली ता.वरला याने दि. १ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास त्याच्या पत्नीला जेवण न बनविल्याच्या कारणावरून लाकडी काठ्यांनी मारहाण केली. दरम्यान बुरकीबाई बाळू बारेला यांना डोक्यात जबर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना लागलीच रुग्नालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या प्रकरणी मयत विवाहितेच्या भाऊने दि. २२ रोजी एरंडोल पोलिसांत तक्रार दिली. घटनास्थळी चोपडा उपविभागीय अधिकारी तृषिकेष रावेल, एरंडोल पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांनी दि. २२ रोजी ३ ते ५ दरम्यान भेट दिली. त्यानुसार आरोपी पती बाळू बारेला यांच्या भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here