पिंप्राळा आठवडेबाजारातून मंगळसूत्र चोरी; गुन्हा दाखल

chain-snatching-at-jalgaon

जळगाव (प्रतिनिधी असलम खान) : पिंप्राळा आठवडे बाजारात आलेल्या महिलेचे गळ्यातून ५५ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरुन नेले असून, याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील मानराज पार्क परिसरातील विद्यानगर येथे हेमलता उमेश पाटील (वय २०) या वास्तव्यास आहेत. त्या बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पिंप्राळा येथील आठवडे बाजारात आल्या होत्या. यादरम्यान हेमलता पाटील यांच्या गळ्यातील १५ ग्रॅमचे मंगळसूत्र हेमलता यांना कळू न देता अंत्यत शिताफीने चोरट्यांनी चोरुन नेले.

प्रकार लक्षात आल्यानंतर हेमलता यांनी बाजारात शोध घेतला मात्र मंगळसूत्र मिळून आले नाही. चोरीची खात्री झाल्यावर हेमलता पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here