जुन्या वादाची कुरापत काढून तिघांनी केली महिलेला बेदम मारहाण

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : लोहशिंगवे (दे.कॅम्प) येथे महिलेशी जुन्या वादाची कुरापत काढून तिघांनी बेदम मारहाण केल्याप्रकरणी तिघांविरूध्द देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मारहाणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत महिलेच्या पायाच्या गुडघ्यास गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी महिलेचे पती अशोक पोपट मोरे (४६ रा.सदर) यांनी तक्रार दाखल केली आहे. संदिप भगवान जुंद्रे (४०),राहूल धनराज मोरे (३७) व मिलींद धनराज मोरे (३५ रा.सर्व लोहशिंगवे) अशी संशयितांची नावे आहेत. मोरे यांच्या पत्नी गेल्या गुरूवारी रात्री आपल्या घरासमोर जेवणाचे भांडे धुवत असतांना ही घटना घडली.

संशयितांनी महिलेस गाठून जुन्या वादाची कुरापत काढून शिवीगाळ केली. यावेळी संतप्त त्रिकुटाने महिलेस लाथाबुक्यांनी मारहाण केली. या झटापटीत महिला रस्त्यावर पडल्याने तिच्या पायाच्या गुडघ्यास मोठी दुखापत झाली असून अधिक तपास जमादार पाचोरे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here