प्रयत्न डेव्हलपर्स व शिवशाही प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपणासाठी ग्रीन फाऊंडेशनला खड्डे खोदण्याची मशीन भेट

shivshahi-pratishthan-loni-kalbhor

लोणी काळभोर (प्रतिनिधी) : ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजीत लोणी काळभोर तीर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदिर परिसर १ लाख वृक्षारोपण/वृक्षसंवर्धन मोहीम राबविण्यात येत आहे या कार्याला चालना मिळावी तसेच जास्तीत जास्त वृक्षारोपण तसेच वृक्ष संवर्धन व्हावे या अनुषंगानेच प्रयत्न डेव्हलपर्स/ शिवशाही प्रतिष्ठान यांच्या वतीने खड्डे खोदण्याची मशीन ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांस भेट दिली.

यावेळी अनिषशेठ काळभोर, युवराज शेठ काळभोर, सचिन शेठ झेंडे, प्रमोदभाऊ काळभोर, दत्तात्रय शेंडगे, मंगेश कोळपे, अभिजीत बोधे उपस्थित होते.

खड्डे खोदण्याची मशीन ग्रीन फाऊंडेशनला भेट दिल्याबद्दल ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी प्रयत्न डेव्हलपर्स तसेच शिवशाही प्रतिष्ठान यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here