शिर्डी (प्रतिनिधी) : साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी मध्ये २१ जून रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिवशी ग्रेट वेलनेस कोच श्री त्रिभुवन, अनिल सर, दत्ता शिरसागर सर तसेच गायकवाड विश्वनाथ सर, कुमावत, भूषण सर लाभलेले पाहुणे व श्री तानाजी वामनराव गोंदकर पाटील संस्थेचे चेअरमन या सर्वांनी मिळून स्टेजवर मुलांना योगाचे प्रशिक्षण दिले व इतर एक्झरसाइजचे प्रकार म्हणजेच वर्कआउट करून दाखवले
या कार्यक्रमाला मुलांनी उत्साहाने प्रतिसाद दिला तसेच मान्यवरांनी व शाळेच्या प्राचार्य कुरे मंगला मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनीही सहभाग नोंदवला आनंददायी वातावरणात जागतिक योग दिन साजरा झाला.







