औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : एसटी महामंडळातील वाहक महिला कर्तव् यावर असताना तिचा हात पकडून, विनयभंग करीत ठार मारण् याची धमकी दिल्याप्रकरणी खासगी वाहनाचा एजंट जाकेर खान मेहबूब खान (३५, रा. भोईवाडा) याला एक वर्ष सक्तमजुरी आणि विविध कलमांखाली 28 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. रामगडिया यांनी ठोठावला. विशेष म्हणजे दंडाच्या रकमेपैकी दहा हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडित वाहक महिलेला देण्याचे आदेशदेखील न्यायालयाने दिले आहेत.
प्रकरणात एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत असणाऱ्या ३० वर्षीय पीडिता २४ मे २०१७ रोजी मध्यवर्ती बसस्थानक येथे कर्तव्यावर होत्या. सकाळी शिवनेरी बसमध् ये जाणाऱ्या प्रवाशांनी बुकिंग करून त्या लेखणी आणण्यासाठी मध्यवर्ती बसस्थानकाजवळील दुकानावर जात होत्या. त्यावेळी बसस्थानक परिसरात नेहमी फिरणारा खासगी वाहनांचा एजंट जाकेर खान याने बळजबरी पीडितेचा हात पकडून ’चल, तुला चहा पाजतो,’ असे म्हणत हात ओढला. पीडितेने त्याला विरोध केला, त्याच वेळी तेथे आरोपीचे दोन साथीदार आले. ते पीडितेला एकमेकांच्या अंगावर ढकलून झोंबाझोंबी करू लागले. जाकेर याने वाईट हेतूने पीडितेचा शर्ट धरून ओढत विनयभंग केला. पीडितेने आरडाओरड केल्याने तिचे सहकारी तेथे आले व त्यांनी तिची सुटका केली, परंतु आरोपींनी पीडितेला शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी उपनिरीक्षक शिंदे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीवेळी अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता बाळासाहेब लोमटे यांनी पाच साक्षीदारांचे जवाब नोंदवले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून आरोपी जाकेरला दोषी ठरवून भादंवि कलम ३५४ अन्वये एक वर्ष सक्तमजुरी आणि २५ हजार रुपयांचा दंड, एक महिना सक्तमजुरी आणि प्रत् येक कलमाखाली एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.






