पोटच्या मुलीवर बाप-काकासह अनेकांचा सामूहिक अत्याचार

Rape-on-girl

समस्तीपूर (बिहार) : जिल्ह्यातील सिंघिया पोलीस स्टेशन परिसरातील गावातून सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचा खुलासा पीडितेने स्वतः सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून केला आहे. व्हिडिओमध्ये पीडित मुलगी सांगत आहे की, दररोज २० ते २५ लोक तिच्यावर बलात्कार करतात. वडील आणि काकाही तेच करतात. पोलीस ठाण्यातून पोलीस येतात, तेच क्रुर काम करतात. पीडितेने रेकॉर्ड केलेला हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पीडितेच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती तिच्यावर जबरदस्ती करताना दिसत आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे या गैरकृत्यात मुलीची आईही सहभागी आहे. वडील आणि आई पैशासाठी इतरांना बलात्कार करायला लावतात, असे व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे. नकार दिल्यास बेदम मारहाण केली जाते. तिची आई घरी दारू विकते, असेही पीडितेने सांगितले. पोलिस स्टेशनचे पोलिसही घरी येतात, दारू पितात आणि माझ्यासोबत घाणेरडे काम करतात. पंचायतीचे माजी प्रमुखही दारू पिऊन तेच करतात. संरक्षण द्यावे अन्यथा हे लोक तिची हत्या करतील, अशी विनंती पीडितेने केली आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर समस्तीपूर पोलीसांनी कारवाई सुरू केली. यानंतर महिला पोलिसांनी मुलीला तसेच तिच्या आई आणि वडिलांना रोसडा येथे नेले. याप्रकरणी महिला पोलिस ठाण्याच्या प्रमुख पुष्पलता यांनीही रोसडा येथे पोहोचून तरुणीचा जबाब नोंदवला. पोलिसांनी मुलीच्या पालकांसह तिघांना अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस अधीक्षक हृदयकांत यांनी रोस्डा एसडीपीओला चौकशीचे आदेश दिले आहेत. मुलीचे आई,वडील आणि काका यांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here