कुर्ला परिसरातून २३ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : कुर्ला परिसरातून सलीम कुरेशी (वय ३२) या इसमाकडून १५६ ग्रॅम मेफेड्रॉन एम.डी हा अंमली पदार्थ मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला. जप्त केलेल्या अमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २३ लाख ४० हजार असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.


२९ जून रोजी अंमली पदार्थ विरोधी कक्ष, कांदिवली युनिट कुर्लाच्या मुंबई परिसरात गस्त करीत असताना, त्या ठिकाणी एक इसम संशयास्पद हालचाली करत असल्याचे आढळून आले. पोलीस पथकास पाहताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु पळून जायचं प्रयत्न करत असताना त्यास पथकाने घेराव घालून अटक केली.

आरोपी सलिमची तपासणी केली असता त्याच्या खिशात एक काळया रंगाच्या कॅरीबॅगेमधील १५६ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ मिळुन आला. त्या अन्वये इसमाच्या विरोधात भादवी कलम ८ (क) सह २२ (क) एन.डी.पी.एस. कायदा १९८५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्यात आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणात अमली पदार्थांच्या पुरवठादारांचा शोध घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here