जॅमर आणि नेटवर्क बूस्‍टरच्‍या खासगी वापरावर बंदी

mobile-jammer

नवी दिल्ली (उपसंपादक जीवन षाकया) : जॅमर, नेटवर्क बूस्‍टर आणि रिपाटर्सच्‍या खासगी वापरावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. दूरसंचार विभाग आणि दळणवळण मंत्रालयाने १ जुलै २०२२ पासून वायरलेस जॅमर आणि बुस्‍टरच्‍या वापरावर मार्गदर्शक तत्‍वे जारी केले आहेत.

नवीन मार्गदर्शक तत्‍वांनुसार आता केंद्र सरकारच्‍या परवानगीशिवाय जॅमर, जीपीएस ब्‍लॉकर्स किंवा इतर सिग्‍नल जॅमिंग उपकरणाचा वापर बेकायदेशीर ठरणार आहे. तसे याच्‍या खासगी खरेदी-विक्रीवरही पूर्णपणे बंदी घालण्‍यात आली आहे.

सिग्‍नल रिपाटरर्स / बुस्‍टर बंदी निर्णय स्‍वागत करतो. मोबाईल सिग्‍नल बूस्‍टर खरेद-विक्री, इन्‍स्टॉल, वायरलेस टेलिग्राफी कायदा १९३३ आणि इंडिया टेलिग्राफ कायदा, १८८५ अंतर्गत बेकायदेशीर आणि दंडनीय गुन्‍हा आहे हे नागरिकांना निर्दोष नेटवर्क देण्‍यासाठी या निर्णयाचा फायदा होणार आहे, अशा शब्‍दात सेल्‍युअर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाने ( सीओआयए) केंद्र सरकारच्‍या या निर्णयाचे स्‍वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here