अग्निपथ योजनेच्या विरोधात विद्यार्थी काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

vidyarthi-congress

परभणी (प्रतिनिधी) : भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रियेत बदल करुन केंद्रातील भाजपा सरकारने नुकतीच अग्निपथ योजना जाहीर केली या योजनेमुळे देशातील तरुणांचे भवितव्य धोक्यात आले असुन हा निर्णय रदद करावा यासाठी परभणी जिल्हा विद्यार्थी काँग्रेस व परभणी शहर युवक काँग्रेस च्या वतीने या निर्णयाविरुध्द स्वाक्षरी मोहिम शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परभणी येथे घेण्यात आली .

सर्व विद्यार्थ्यांचे स्वाक्षरी असलेले बॅनर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने पाठवुन या निर्णयाचा विरोध दर्शविणार आहेत

यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव मयुर मोरे, अध्यक्ष श्रीकांत पाटील , युवक काँग्रेस उपाध्यक्ष अब्दुल सईद , सचिन जवंजाळ , डिगांबर खरवडे , अमेर हाशमी , सचिन मुंडे , इरफान जमीनदार , अमोल डाखोरे , निखील धामणगावे व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here