आमोदा येथील पशुवैद्यकीय दवाखाना बंद; परिसरातील पशुपालक शेतकरी संतप्त

amoda-veternary-hospital

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : आमोदा येथे पशुवैद्यकीय अधिकारी आहे किंवा नाही ? असा प्रश्न उपस्थित होत असल्याने तसेच पशुवैद्यकीय दवाखाना सतत बंद असल्याने शेतकरी व पशुपालक यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


आमोदा येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे परंतु त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी आणि संबंधित कोणताही कर्मचारी उपस्थित राहत नसून अनेक दिवसांपासून पशुवैद्यकीय दवाखाना बंद अवस्थेत आहे त्यामुळे पशुपालन करणारे शेतकरी आणि नागरिकांना गाई,म्हशी, शेळ्या, मेंढ्या, पाळीव कुत्रे इ.प्राण्यांवर उपचार करण्यासाठी भटकंती करावी लागते तसेच जर पशुवैद्यकीय अधिकारी कोण्या दिवशी उपस्थित असला तरी सरकारी नियमाने फी वसूल न करता शेतकऱ्यांकडून मोठ्या रकमेची मागणी करण्यात येते. औषधी ,गोळ्या उपलब्ध करून दिल्या जात नाही तसेच पशुवैद्यकीय अधिकारी कामावर रुजू झाल्यापासून शेतकऱ्यांनी त्यांना कॉल केला असता आम्ही सुट्टीवर आहे असे सांगण्यात येते. शेतकरी व पशुपालक यांच्याशी अरेरावीच्या भाषेत बोलले जाते.


या सर्व प्रकारामुळे गावकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.तरी जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांनी तातडीने लक्ष केंद्रित करून पशुवैद्यकीय दवाखाना बंद का असतो तिथे डॉक्टर ,कंपाउंडर ,संबंधित कर्मचारी उपलब्ध नाहीत का ?,याबाबतची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करून आमोदा येथे पशुवैद्यकीय अधिकारी दवाखान्यात हजर राहण्याबाबत कारवाई करावी अशी मागणी आमोदा ग्रामस्थांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here