जळगाव (संपादक सुनिल पाटील) : खान्देश हित संग्राम या संघटनेत विजू नाना पाटील यांची राष्ट्रीय कार्यकारणीत उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे पत्र देताना खान्देश हित संग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष भैयासाहेब पाटील, खान्देश हित संग्रामचे प्रवक्ते सुरेश पाटील व खान्देश हित संग्रामचे खजिनदार कैलास पाटील उपस्थित होते.
खान्देश हित संग्रामच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विजू नाना पाटील यांचे समाजातील सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.







