आमदार तानजीराव सावंत यांच्याविरोधात परंडा येथे शिवसैनिकांची घोषणाबाजी

paranda-shivsena

परंडा (प्रतिनिधी सुरेश बागडे) : शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटात आमदार तानाजीराव सावंत हे सहभागी झाल्याने धाराशिव व परंडा येथे सावंत यांच्या निषेधार्थ घोषणा बाजी करून शिवसैनिकांनी निर्देशने केली आहे . परंडा शहरातील शिवसैनिकांनी दि २५ जुन रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सावंत यांच्या फोटोला शाई लाऊन घोषणा बाजी केली आहे .

परंडा तालूक्यातील सर्व शिवसैनिक माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वा खाली शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे असल्याचे यावेळी जनार्धन मेहेर यांनी सांगीतले .या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर इतापे यांच्या सह शिवसैनिक उपास्थित होते .

शहरातील व तालूक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे .प्रसिद्धी पत्रकावर जनार्धन मेहेर , ता उप प्रमुख दिलिप रणभोर , माजी नगर अध्यक्ष शिवाजी मेहेर , माजी नगर अध्यक्षा राजश्री शिंदे शहर उप प्रमुख सुभाष शिंदे , माजी उप नगर अध्यक्ष इस्माईल कुरेशी , माजी नगर सेवक मकरंद जोशी , मिरा संजय कदम ,मैनुद्दीन तुटके , मन्नान बासले , अब्बास मुजावर , इरफान शेख , विनोद साळवे , शिवाजी बापू मेहेर , प्रकाश सोनवणे,उमेश परदेशी , महेमुद पठाण , संतोष गायकवाड , तुकाराम गायकवाड , दत्ता मेहेर , दत्तू धनवे , राहुल देवळे , रईस मुजावर , रफीक मुजावर , प्रशांत गायकवाड , प्रितम डाके , रामलिंग डाके , इरफान सौदागर , कुणाल जाधव , चैतन्य यादव ,योगेश बुरंगे , मयूर वाघमारे , विकास साळुंके , यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here