महात्मा फुले हायस्कूलच्या माजी विदयार्थ्यांनी दिल्ली शाळेला देणगी

धरणगाव (योगेश पी पाटील) – येथील सुवर्ण महोत्सवी महात्माफुले हायस्कूल येथील माजी विद्यार्थी मा.प्रभारी नगराध्यक्ष विजय महाजन यांनी अकरा हजार रुपये,मा.प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी यांनी वॉटर कुलर देणगी दिली. नगरसेवक सुरेश महाजन यांनी अकरा हजार रुपये ,नगरसेवक सुरेश पारेराव यांनी 5100 रुपये,
शाळेतील ज्येष्ठ शिक्षक विनोद जाधव यांच्याकडे त्यांनी देणगी स्वीकृत केली.
या आधी सुद्धा अनेक माजी विद्यार्थ्यांनी देणग्या दिल्या असून विजय महाजन यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले ज्या शाळेत माझे बालपण गेले मला ज्या गुरूंनी घडवले त्यांच्या आशीर्वादाने मी धरणगाव न.पा. मध्ये ग्रंथपाल म्हणून कार्यरत असून माझी धर्मपत्नीला पालकमंत्री गुलाबरावजी पाटील व जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या सहकार्याने प्रभारी नगराध्यक्ष पदाच्या मान मिळाला मि ज्या समाजाचे नेतृत्व करतो त्या समाजाने सुद्धा मला खूप सह सहकार्य केले त्यामुळे आपलेही काहीदेणे लागते जे जे मा.विद्यार्थी मोठ्या पदावर गेलेले आहेत त्यांनी सुद्धा मदत करावी असेही विजय महाजन यांनी आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here