पैलवान गृप धुळे व कुस्ती प्रेमी तर्फे गोकुळ अष्टमी निमित्ताने वरखेडी व जयमल्हार नगर येथे धान्यवाटप कार्यक्रम

धुळे (प्रतिनिधी धनंजय गाळणकर) – गोकुळ अष्टमी दिनाचे औचित्य साधून पैलवान गृप कुस्ती प्रेमी महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा टिमच्या वतीने वरखेडी व जयमल्हार नगर,देवपूर धुळे येथे संस्थापक अध्यक्ष पहिलवान मारुती भाऊ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली खान्देश अध्यक्ष पहिलवान सनीभाऊ वाडेकर यांचे उपस्थितीत व सौ.कविताताई कोळी महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुख यांच्या हस्ते गरजू परिवारांना धान्य वाटप करण्यात आले.याप्रसंगी धुळे जिल्हा टिम पहिलवान व महाराष्ट्र चॅम्पियन किर्तीताई गुंडलेकर (धुळे जिल्हा महिला अध्यक्षा)पहिलवान आकाशभाऊ कदम (धुळे जिल्हा उपाध्यक्ष), मनोज भाऊ पाटील, धुळे ग्रामीण अध्यक्ष, गणेश कापसे,उमेश अजळकर,युवराज कोळी ईत्यादी उपस्थित होते,दरवर्षी प्रमाणे दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पहिलवान सनीभाऊ वाडेकर साजरा करत असतात.परंतु कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करुन तोच खर्च अन्नदानातुन करण्यात यावा असे गृपच्या सर्वानुमते ठरवुन आजचे वाटप करण्यात आले.असे सौ कविता ताई कोळी महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुख यांनी सागितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here