बेटावद येथे महसूल मंडळात प्रधानमंत्री पीक विमा योजने बाबत जनजागृती मोहीम

शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत जास्तीत जास्त सहभागी व्हावे – कृषी सभापती बापू खलाणे

दोंडाईचा (संतोष कोळी) – शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना अतिशय चांगली व फायद्याची असून याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी सभापती बापूसाहेब खलाणे यांनी बेटावद येथे केले. कृषीभूषण अँड.प्रकाश पाटील म्हणाले की मी या योजनेत केंद्र व राज्य स्तरावर काम करतो, राज्यात या योजनेचे सर्वात जास्त काम असून आजतागायत सर्वात जास्त नुकसान भरपाई धुळे जिल्ह्याला खरीप 2019 ची मंजूर करण्यात आली. परंतू दुर्दैवाने माझ्या धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील शेतकरी या योजनेत अतिशय कमी प्रमाणात सहभागी होतात , तरी यापुढे सावध होऊन दुष्काळी किरकोळ मदत न मागता यापेक्षा कितीतरी पटीने हक्काने मिळणारी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी होऊन वास्तव पीक कापणी प्रयोगाची आकडेवारी दाखवून मंजूर करून घ्यावी अशी सविस्तरपणे माहिती पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना देण्यात आली. सदर प्रसंगी धुळे जि प चे कृषी सभापती बापूसाहेब खलाणे , जि.प.सदस्य प्रतिनिधी नथ्थू आबा वारुडे , काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रावसाहेब पाटील , मा.जि.प. सदस्य मंगेश पवार ,वालखेडा चे पं.स. सदस्य मनोज मोरे, पं.स.सदस्य राजेंद्र कोळी , बेटावद सरपंचअरुण देशमुख , ग्रा.पं.सदस्य डी.एम पाटील ,,सर्कल श्री नेरकर , पोलीस पाटील श्रीराम सोनवणे व शेतकरी वर्ग आदी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन कृषी भूषण अँड.प्रकाश पाटील यांनी केले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here