धरणगांव. (उपसंपादक प्रा. पी एम पाटील) – मंगळवारी शहरातील “सुवर्णमहोत्सवी शाळा ” महात्मा फुले हायस्कूल च्या मुख्याध्यापक पहील्यांदाच मोठा माळी वाडा, धरणगांव येथील स्नुषा व डॉ. रविंद्र तुकाराम सोनवणे यांच्या धर्मपत्नी सौ. पुष्पा रविंद्र सोनवणे यांनी पदभार स्विकारला.माळी समाज पंचमंडळ धरणगांव च्या वतीने माळीवाडा येथील प्रथम महिला मुख्याध्यापिका सौ. पुष्पा रविंद्र सोनवणे यांचा पुष्पगुच्छ व ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.
माळी समाज पंचमंडळ धरणगांवचे अध्यक्ष विठोबा माळी , उपाध्यक्ष योगराज महाजन , निंबाजी महाजन , सचिव दशरथ महाजन , विजयभाऊ महाजन , सुखदेव महाजन , कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी , रविंद्र बाविस्कर यांनी सावता महाराज , महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांचा ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापिका सौ. पुष्पा रविंद्र सोनवणे व पर्यवेक्षक जे.एस.पवार सर यांचे स्वागत केले .
याप्रसंगी शाळेतील शिक्षक व्ही.पी. महाले , पी.डी पाटील , हेमंत माळी , एम.बी. मोरे , एस.व्ही.आढावे तसेच सर्व शिक्षक बंधु -भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते. सुवर्णमहोत्सवी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापकपदी माझी नियुक्ती झाली हे माझे परम भाग्यच आहे. मी सावित्रीमाईची लेक या पदाला मी नक्की न्याय देईल असे प्रतिपादन सौ. पी.आर. सोनवणे मॅम यांनी केले.
Home उत्तर महाराष्ट्र धरणगाव माळी समाज धरणगांव च्या वतीने माळीवाडा येथील प्रथम महिला मुख्याध्यापिका सौ. पुष्पा...







