मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – दिनांक १२ ऑगस्ट २०२० रोजी बोरीवली पश्चिम येथील बॉस्को बॉयस होम या वस्तीगृहात सकाळी ११.३० ते १२.३० दरम्यान कोरोना काळातील सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून मुलांना व्यसनमुक्तिवर मार्गदर्शन करण्यात आले. देशभरात, राज्यांमधे तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरांमध्ये विविध प्रकारच्या वाढणाऱ्या व्यसनांचे प्रमाण त्यातून उध्वस्त होणारे कुटुंब हे सर्व पाहता नशाबंदी मंडळ महारष्ट्र राज्य नेहमीच जनजागृतीचे उपक्रम राबवत असते. याच मंडळाच्या मुंबई पश्चिम विभाग संघटक सौ. दिशा कळंबे यांनी बॉस्को बॉयस होम या वसतीगृहात व्यसनमुक्तीचा जागर ह्या उपक्रमा अंतर्गत महिन्यातून कमीत कमी दोनदा तरी येथील मुलाना मार्गदर्शन करत आहेत.
गोपाळकाला यानिमित्त हा उपक्रम घेतला गेला आहे. यावेळी पोस्टर प्रदर्शनाद्वारे मुलाना पोस्टर्सची माहिती घ्यायला सांगून व्यसनांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम आणि व्यसनांचे प्रकार याबद्दल अवगत केले. त्याचबरोबर प्रश्नोत्तरीचा खेळही घेण्यात आला. सदर कार्यक्रमात ४० विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि वस्तीगृहाचे ब्रदर जतिन, ब्रदर नीलेश दामोदर उपस्थित होते. ब्रदर जतिन यांनी कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला याची माहिती आणि महत्त्व सांगून सौ. दिशा कळंबे यांच्याद्वारे या नवतरुण कृष्णाना आजीवन व्यसनमुक्तीचा संकल्प देण्यात आला.








