धुळे (विशेष प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र
समितीतर्फे वलवाडी येथील निसर्गमित्र कार्यालयात राजमाता अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी मोजक्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
यावेळी निसर्ग-मित्र समितीचे संस्थापक-प्रेमकुमार अहिरे,समितीचे प्रवक्ते तथा स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा डॉ प्रविणसिह गिरासे, धनगर समाज महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा निसर्ग-मित्र समिती चे संघटक विठ्ठलराव धनगर,जेष्ट पर्यावरण प्रेमीं डॉ विनोद भागवत,धुळे शहर संघटक शिवाजी बैसाणे,साक्री तालुका संपर्क-प्रमुख राकेश जाधव,जिल्हा संपर्क-प्रमुख शाहिर विजय-वाघ सर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी निसर्ग-मित्र समिती चे धुळे शहर संपर्क-प्रमुख तथा एकविरा कृषी सेवा केंद्राचे संचालक , सामाजिक कार्यकर्ते पर्यावरण प्रेमीं वैभव दादा पाटील ,व निसर्गमित्र समिती चे संघटक व आदर्श शिक्षक सुकलाल बोरसे सर यांचा वाढदिवस निमित्ताने विशेष सत्कार करण्यात आला ,तसेच कानोसा कॉन्वेट हायस्कूल चा विद्यार्थी प्रितेश बोरसे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला.









