दोंडाईचा (संतोष कोळी) – रोटरी क्लब ऑफ दोंडाईचा सिनियर्सच्या माध्यमातुन दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटरला किमान २५ कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त अशी सेंट्रल आँक्सिजन सीस्टीम बसवीण्यात येत आहे त्याप्रकारचे आवाहन दोंडाईचा सोशल ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आले होते त्या आवाहनास प्रतिसाद देऊन दोंडाईचा अपर तहसीलदार सुदाम महाजन यांनी २५००० रु चा धनादेश रोटरी सिनियर्सचे जेष्ठ सदस्य डॉ दिपक सराफ व अध्यक्ष चेतन सिसोदिया यांच्याकडे सोपविला.
याप्रसंगी तहसीलदार सुदाम महाजन यांनी सांगितले की माझे बालपण खुपचं कष्टमय होते मला मिळालेले पहिले नविन कपडे हे रोटरीच्या माध्यमातून मिळाले होते कष्टमय जिवन जगतांना रोटरी सारख्या संस्थामुळे उच्चशिक्षण घेऊन तहसीलदार पदापर्यंत पोहचलो म्हणुन मी माझ्या आयुष्यात पगारातील १० % रक्कम मी समाजसेवेसाठी खर्च करतो रोटरी सिनियर्सच्या माध्यमातून कोरोनाच्या रुग्णांसाठी सेंट्रल आँक्सिजन सीस्टीम हा प्रकल्प रुग्णांना जिवनदान देणारा आहे म्हणुन मी माझी छोटी मदत जाहीर करीत आहे . तसेच दोंडाईचा नगरपलीकेचे नुतन मुख्याधिकारी डॉ प्रविण निकम यांनी देखील उत्कृष्ठ कार्यास माझ्या शुभेच्छा असुन ५००० रु चा धनादेश त्यांनी प्रविण महाजन यांच्याकडे सोपविला .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रविण महाजन यांनी सांगितले की दोंडाईचात कोरोनाला ७२ दिवसांपर्यंत शिरकाव करु दिला नव्हता यांचे श्रेय महसुल प्रशासन ,नगरपलीका , आरोग्य विभाग यांना जाते परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन रुग्णांना अत्यावश्यक सेवा दोंडाईचातच मिळाली पाहिजे म्हणुन अत्यवस्थ रुग्णांना आवश्यक असलेली सेंट्रल आँक्सिजन सीस्टीमसाठी आवाहन केले आणी दानशुर व्यक्तींनी स्वत फोन करुन मदतीचा पाऊस पाडला .आभार प्रदर्शन करतांना रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया यांनी सांगितले की दानशूर व्यक्तींचा एक पैसा हि वाया जाणार नाही प्रत्येक पैशाचा उपयोग कोरोना रुग्णासाठीच होईल .
याप्रसंगी रोटरी सिनियर्सचे अध्यक्ष चेतन सिसोदिया , डॉ दिपक सराफ, सौरभ मुणोत, राजेंद्र परदेसी, डॉ राजेंद्र पाटील,अँड नितीन अयाचीत ,शेखर कोठारी,सौरव अग्रवाल ,प्रविण महाजन इ सदस्य उपस्थित होते.







