जीन्स घालण्यास मनाई केल्याचा राग आल्याने पत्नीने केली पतीची चाकूने भोसकून हत्या

murder

जामताडा (झारखंड) : येथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीला जीन्स पँट घालण्यास मनाई केल्याने त्याचा राग येऊन पत्नीने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. मृत व्यक्तीच्या वडिलांचे म्हणणे आहे की, मुलगा आणि सून यांच्यात जीन्स घालण्यावरून लग्न झाले होते, त्यानंतर सुनेने चाकूने त्याची हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना जामताडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोडभिटा गावातील आहे. या गावातील आंदोलन टुडू याचे दोन महिन्यांपूर्वी पुष्पा हेंब्रमसोबत लग्न झाले होते. काल रात्री पुष्पा हेंब्रम जीन्स परिधान करून गोपाळपूर गावात जत्रा पाहण्यासाठी गेली होती. ती परत आल्यावर पती आंदोलन टुडू याने आक्षेप घेतला आणि सांगितले की जीन्स घालून जत्रा पाहायला जाऊ नकासे. याचाच राग आल्याने पत्नी पुष्पा हेंब्रम हिने त्याच्यावर चाकूने वार केले. यावेळी आंदोलन टुडू गंभीर जखमी झाला. यानंतर कुटुंबीयांनी त्याला जखमी अवस्थेत धनबाद येथील रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मृत आंदोलन टुडू याचे वडील कर्णेश्वर टुडू यांनी सांगितले की, मुलगा आणि सुनेमध्ये जीन्सवरून वाद झाला होता. या वादातून सुनेने चाकूने वार करून त्याचा खून केला. सुनेनेही चाकूने हल्ला केल्याचे मान्य केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. जामताडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अब्दुल रहमान यांनी सांगितले की, घटनेची नोंद करण्यात आली आहे, मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संबंधित घटनेचा एफआयआर धनबादमध्ये नोंदवण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here