उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हॅण्डबुक प्रकाशित

ajitdada-pawar-dairy-prakashan

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : राष्ट्रवादीचे नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादांचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी एक मोठी पर्वणीच असते. दादांचा वाढदिवस धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करण्यासाठी बारामतीपासून ते राज्याच्या कानाकोपऱ्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व प्रत्येक कार्यकर्ता प्रयत्नशील असतो.

 

जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय सचिव संजय चव्हाण हे गेल्या १४ वर्षांपासून अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हॅण्डबुक प्रकाशित करीत असतात.

 

या ही वर्षी ना.अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादी हॅण्डबुकची चौदावी आवृत्ती खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे प्रकाशित करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कार्यालय सचिव संजय चव्हाण यांच्यासह सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखडे, जिल्हा राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजेश पाटील, जि.प.सदस्य रमेश पाटील, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, युवाअध्यक्ष रमेश पाटील, गणेश पाटील, बटी जावळे आगींसह पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here