६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात मराठीचा बोलबाला

68-national-film-awards-2022

‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : ६८ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आहे. या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा डंका पाहायला मिळाला आहे. मराठीला एकूण ९ पुरस्कार मिळाले आहेत. ‘गोष्ट एका पैठणीची’ हा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरला आहे. तर गोदाकाठ आणि अवांछितसाठी किशोर कदम यांना विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. तर राहुल देशपांडे यांना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमातून तरुणीच्या स्वप्नांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. महिला वर्गासाठी पैठणी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. आपल्या कलेक्शनमध्ये इतर महिलांपेक्षा उठावदार आणि चारचौघात भारी दिसेल अशी पैठणी असावी, अशी इच्छा असते. हीच इच्छा या सिनेमातील अभिनेत्रीची असल्याचं या सिनेमातून दाखवलं आहे. शंतनू रोडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि कथालेखन केलंय.

 

 

 

यांना मिळाले आहेत पुरस्कार…
सर्वोत्कृष्ट अभिनेता (हिंदी) – अजय देवगण, सिनेमा- तानाजी : द अनसंग वॉरियर, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: अपर्णा बालमुरली, सूरराई पोत्रू, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: बिजू मेनन, अय्यप्पनम कोशियम, सर्वोत्कृष्ट बालकलाकार – मराठी चित्रपट, अनिश गोसावी, चित्रपट- टकटक

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – राहुल देशपांडे, चित्रपट – मी वसंतराव, आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर, चित्रपट- सुमी, सर्वोत्कृष्ट गीतकार- मनोज मुंतशीर, चित्रपट- सायना

सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट, तानाजी : द अनसंग वॉरियर, निर्माता- अजय देवगण, दिग्दर्शक- ओम राऊत, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, गोष्ट एका पैठणीची, दिग्दर्शक- शांतनू रोडे, निर्माता, अक्षय बर्दापूरकर

विशेष उल्लेखनीय फिचर फिल्म, जून (मराठी), अभिनेता- सिदार्थ मेनन, गोदाकाठ (मराठी), अवांचित (मराठी), अभिनेता- किशोर कदम, चित्रपटांसाठी सर्वाधिक पसंती मिळालेलं राज्य- मध्यप्रदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here