डोंबिवलीतील पर्यटकांची सिमल्याच्या पर्यटन कंपनीकडून फसवणूक; गुन्हा दाखल

crime
file photo

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : डोंबिवलीतील पर्यटकांच्या एका गटाला मे मध्ये सिमला येथे पर्यटनासाठी जायचे होते. त्यांनी सिमला येथील एका पर्यटन कंपनीकडे हाॅटेल निवास, भोजन, पर्यटन वाहन सुविधेसाठी एकूण १५ लाख ६६ हजार रुपये ऑनलाईन भरणा केले. प्रत्यक्ष पर्यटनासाठी सिमला येथे पोहचल्यानंतर पर्यटन कंपनीने पर्यटकांना कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत. याऊलट वाढीव पैसे आकारून डोंबिवलीतील पर्यटकांची फसवणूक केली म्हणून टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी पर्यटन कंपनी विरुध्द पर्यटकांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मे, जून मध्ये उत्तराखंड, सिमला, हिमाचलप्रदेश येथे कल्याण, डोंबिवलीतील फिरण्यासाठी गेलेल्या अनेक पर्यटकांची अशाच प्रकारे पर्यटन सेवा कंपन्यांनी फसवणूक केल्या असल्याच्या तक्रारी स्थानिक पोलीस ठाण्यात केल्या आहेत. डोंबिवलीतून संदीप प्रभुदेसाई आणि त्यांच्या सोबत ७० पर्यटन या भागात प्रवासासाठी गेले होते. तेथे त्यांची हाॅटेल सुविधा देताना गैरसोय करण्यात आली. याविषयी स्थानिक पोलीस ठाण्यात ७० जणांच्या गटाने पोलीस ठाण्यात तक्रार केली. असाच प्रकार कल्याण मधील नागरिक ठाकूर यांच्या गटाबरोबर झाला. त्यांनी पर्यटन सेवा देणाऱ्या कंपनीकडे यासंदर्भात नाराजी व्यक्त केली.

 

पोलिसांनी सांगितले, सुनील गंगाधर लिमये (रा. ४३, रा. एकनाथ म्हात्रे नगर, संत नामदेव पथ, गोग्रासवाडी, डोंबिवली पूर्व) हे व्यावसायिक आपल्या मित्रांसह २२ मे ते ३ जून कालावधीत सिमला येथे पर्यटनासाठी गेले होते. तेथे जाण्यापूर्वी त्यांनी सिमला येथील कलर्स ऑफ इंडिया टुर्स कंपनीकडे डोंबिवलीतून ऑनलाईन पध्दतीने जाणाऱ्या पर्यटकांसाठी हाॅटेल निवास, भोजन, हाॅटेल ते पर्यटन स्थळापर्यंत वाहने, पर्यटक मार्गदर्शक अशा सगळ्या सुविधांसाठी पर्यटन कंपनीच्या सूचनेप्रमाणे १५ लाख ६६ हजार रुपये भरणा केले होते. सिमला येथे लिमये यांचा गट पर्यटनासाठी गेल्यानंतर त्यांना पैसे भरल्याप्रमाणे सुविधा पर्यटन कंपनीने दिल्या नाहीत. एवढेच नव्हे तर आहे त्या सेवांचे वाढीव दर आकरणी त्यांनी केली. आपली फसवणूक पर्यटन कंपनीने केल्याने सुनील लिमये यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात कलर्स पर्यटन कंपनी विरुध्द तक्रार केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here