कामावर घेतले नाही म्हणून नोकराने केला दुकानदार महिलेचा विनयभंग

vinaybhang
file photo

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : कामावर घेण्यास नकार दिल्याने दुकानदार महिलेच्या घरी जाऊन तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला ही घटना रविवारी (दि.३१) सकाळी पिंपळे निलख येथे घडली. पीडित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी रितेश रोहिदास सातसमुद्रे (वय २०, रा. बालेवाडी, पुणे) या तरुणाला अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेच्या दुकानावर जानेवारी २०२२ पासून कामास होता. त्याला १४ जुलैपासून फिर्यदिने कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर तो पुन्हा रविवारी (दि. ३१) फिर्यादी महिलेच्या दुकानावर आला.

त्याने या महिलेला पुन्हा कामावर घेण्याची विनंती केली. मात्र फिर्यादीने त्यास नकार दिला. त्यानंतर फिर्यादी फ्लॅटवर गेल्या असता आरोपी फिर्यादीच्या पाठीमागून फ्लॅटवर गेला. तेथे फिर्यादी सोबत गैरवर्तन करत विनयभंग केला. सांगवी पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here