हद्दपार केलेल्या गुंडाला खंडणीविरोधी पथकाने केले जेरबंद

arrested
file photo

ठाणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रकाश कदम) : मुंबई आणि ठाण्यातून हद्दपार केलेल्या सचिन विनय शर्मा (२०, रा. वागळे इस्टेट, ठाणे ) या गुंडाला गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी दिली.

सचिन शर्मा याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी त्याला ठाणे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या तीन जिल्ह्यांमधून वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलिस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी २७ मार्च २०२२ रोजी हद्दपारीचे आदेश दिले होते. तरीही तो वागळे इस्टेट परिसरात मोकाट फिरत असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या आधारे या पथकाने २० सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अंबिकानगर क्रमांक दोन वागळे इस्टेट परिसरातून त्याला ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here