कल्याण येथे शिधावाटप मध्यस्थाला लाथाबुक्क्यांनी मारहाण

marhan
file photo

कल्याण (क्राइम रिपोटर प्रवीण जाधव) : शिधावाटप कार्यालयात अधिकारी आणि ग्राहक यांच्यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या एका शिधावाटप मध्यस्थाला चार जणांनी लाथाबुक्की आणि लोखंडी सळईने बेदम बुधवारी मारहाण केली आहे. या मारहाणीत मध्यस्थाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

 

बुधवारी दुपारी मुरबाड रस्त्यावरील प्रशांत हाॅटेलच्या समोर हा प्रकार घडला. क्रिश चाळके आणि त्याचे तीन साथीदार या प्रकरणात आरोपी आहेत. तुषार शशिकांत आहेर (३५) असे शिधावाटप मध्यस्थाचे नाव आहे. ते रामबाग भागात राहतात. तुषार यांनी या मारहाण प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

 

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार तुषार आहेर हे शिधापत्रिका तयार करण्याचे काम ग्राहकांकडून घेतात. असेच काम तुषार यांनी आरोपी क्रिश चाळके यांच्याकडून घेतले होते. अनेक दिवस उलटले तरी तुषार नवीन शिधापत्रिका देत नाहीत म्हणून आरोपी क्रिश संतप्त झाले होते. बुधवारी संध्याकाळी तुषार आहेर मुरबाड रस्त्याने पायी चालले होते. तेथे क्रिश चाळके आपल्या तीन साथीदारांच्या बरोबर आला. त्याने तुषार यांना शिवीगाळ करत शिधापत्रिका वेळेत देता येत नसेल तर कशाला लोकांची कामे करायला घेता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here