पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमिला टेमगिरे) : महाराष्ट्र राज्य जीवनउन्नत्ती उमेद अभियान महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी अनेक प्रकारचे प्रशिक्षण देत आहेत.
या प्रशिक्षण घेऊन महिलांचा स्वतःचा आर्थिक विकास तर होतोच परंतु उद्योग व्यवसायासाठी आवश्यक संसाधने त्यांचे व्यवस्थापन या उमेद संस्थेच्या माध्यमातून महिलांना होत असते असच एक ऑडिटर प्रशिक्षण पुणे येथे आयोजित करण्यात आले होते त्या प्रशिक्षणासाठी अहमदनर, व पुणे जील्ह्यातून जवळ जवळ ३६ महिलांनी सहभाग घेऊन प्रशिक्षण पूर्ण केले .
या चार दिवसाच्या पुणे येथील प्रशिक्षणात त्यांना लेखापरीक्षण ट्रेनिंग साठी ज्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या जिल्हा व्यवस्थापक – सपना करकंडे मॅडम,सोनाली अवचट मॅडम , उषा अभंग मॅडम,सुजाता झरेकर मॅडम,राणी ननवरे मॅडम.यांनी महिलांना खूप छान पद्धतीने प्रशिक्षण दिले. व त्याची ऑनलाईन परीक्षा घेऊन त्यांना लेखापरीक्षक प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.
रमेश चव्हाण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे व जिल्हा परिषद प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या मार्गर्शनाखाली पुणे जिल्हा उमेद अभियान अंतर्गत प्रभाग संघ व ग्राम संघ लेखापरीक्षण संपन्न झाले.







