पारनेर (प्रतिनिधी दिपक वरखडे) : राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिरे ही समाज परिवर्तनाची कार्यशाळा बनत असल्याचे प्रतिपादन पारनेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे समुपदेशक डॉ . विकास वाळुंज यांनी केले आहे .
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि श्री मुलिकादेवी महाविद्यालय निघोज यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर बाभुळवाडे या गावांमध्ये सुरू आहे या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना लोकसंख्या शिक्षण व लैंगिक शिक्षण काळाची गरज या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. विकास वाळुंज हे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शन करताना एच आय व्ही एड्स यांच्या विषयी युवकांना मार्गदर्शन केले. एड्स होण्याची कारणे त्याचे परिणाम , तसेच तो होऊ नये ,यासाठी घ्यावी लागणारी काळजी याविषयी मार्गदर्शन करताना डॉ. वाळुंज यांनी अनेक उदाहरणे देत विद्यार्थ्यांना दिले . तसेच इतर रोगांप्रमाणेच एचआयव्हीची लक्षणे व विद्यार्थ्यांनी त्याबाबत घ्यावयाची काळजी आणि भारत सरकार व महाराष्ट्र शासन यांच्या पातळीवर असणारे विविध उपक्रम जनजागृती याविषयी माहिती दिली .
या कार्यशाळेमध्ये सर्व स्वयंसेवकांचे रक्ताचे नमुने घेऊन त्यांची एच आय व्ही तपासणी केली. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर होऊन एचआयव्ही विषयी जनजागृती निर्माण झाली. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. सहदेव आहेर , कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोहर एरंडे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. विक्रम पवार प्रा. अक्षय अडसूळ, प्रा. मनीषा गाडीलकर, प्रा. पुनम गंधाक्ते, प्रा. अश्विनी सुपेकर आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते .
जाईबाई येवले केंद्रीय आदिवासी आश्रमशाळा या शाळेतील मुख्याध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत विद्यार्थी स्वयंसेवक आकाश म्हस्के यांनी केले तर सूत्रसंचालन सादिया शेख यांनी केले या कार्यशाळेचे आभार विद्यार्थी स्वयंसेवक योगिता मदगे हिने केले.







