नालासोपाऱ्यात भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला

attack-on-bjp-karyakarta-at-nalasopara

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : नालासोपाऱ्यात भाजप कार्यकर्त्यांवर चार ते पाच अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. नालासोपारा पूर्वेचे भाजप कार्यकर्ते अरुण श्रीवास्तव यांच्या कार्यालयात घुसून त्यांना चार ते पाच अज्ञात ईसमांनी जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

 

या हल्ल्यात त्यांच्या डोक्यात, हातावर वार केल्याने त्यांना गंभीर इजा झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे.

 

नालासोपाऱ्यात अंमली पदार्थ विकणाऱ्यांविरोधात अरुण श्रीवास्तव यांनी पोलीस ठाण्यात पत्र लिहिलं होतं. याच रागातून त्यांच्यावर हल्ला झाल्याचं प्राथमिक तपासात सांगितलं जात आहे. तुळींज पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here