जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) : चोपडा बसस्थानकात दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या बॅगेत १२ पिस्तूल मिळुन आल्या.
या संदर्भात अधिक असे की, २२ रोजी रात्रीच्या वेळेस चोपडा बसस्थानक परिसरात संशयित आरोपी अमीतकुमार धनपत धानिया (वय ३०, रा. भागवी ता. चरखी दादरी जि. भिवानी, हरियाणा) व शनेशकुमार रामचंदर तक्षक (वय ३२, रा. भागवी ता. चरखी दादरी जि.भिवानी, हरियाणा) हे संशयास्पद फिरत होते. संशयास्पद हालचाली असल्यामुळे पोलिसांनी त्यांची चौकशी केली. यावेळी त्यांच्याकडून पिस्तूल मिळुन आल्या. त्यांनी २ लाख ६० हजार किमंतीच्या १२ गावठी पिस्तूल, मॅग्झीन, पाच जिवंत काडतूस कोणास तरी विक्री करण्यासाठी आणले होते.संशयित आरोपींवर पोलिस कॉन्स्टेबल किरण गाडीलोहार यांच्या फिर्यादीवरून भारतीय हत्यार कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळी चोपडा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण, सहाय्यक पोलिस निरिक्षक अजित साळवे व संतोष चव्हाण यांनी भेट दिली.







