त्रंबकेश्वराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात; तीन गंभीर जखमी

नाशिक (प्रतिनिधी) : महिरावणी जवळ त्रंबकेश्वरला दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकाच्या गाडीचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात झाला आहे. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

 

रस्त्यावरील मोठा खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला आहे. या अपघातात जखमी झालेल्यांवर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहे. त्यातून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या रस्त्यावर तात्पूरती डागडुगी तातडीने केली जात नसल्यामुळे वाहन धारकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्र्यंबक रस्त्यावरही असेच खड्डे रस्त्यावर ठिकठिकाणी आहे. त्यात या खड्डामुळे अपघातही होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here