भुसावळ (प्रतिनिधी रवींद्र कोळी) : भुसावळ येथील दिपनगर प्रकल्प १/६६० भेल कंपनी अंतर्गत असलेल्या धन्वंतरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अशा कंत्राट पद्धतीने काम करून कामगारांना वैद्यकिय सेवा संदर्भात संपूर्ण टेंडर, वर्कर, डॉक्टर यांचे शिक्षण, डीग्री संदर्भात सलग १४ महिने पत्र व्यवहार करून सुद्धा आणि जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी तत्काळ/महत्वाचे पत्र दीप नगर प्रशासनाला देवुन सुद्धा संबधित उपोषणकर्ता मिलींद रामचंद्र सोनवणे, स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना, भारत सरकार नोंदणीकृत, भुसावळ शहर सचिव यांना कागदपत्रे उपलब्ध करून दिले नाही किंवा कागदपत्रे अवलोकनसाठी सुद्धा परवानगी दिली नाही.
यावरून सदर प्रकरणात साटे लोटे करून भ्रष्टाचार करीत असल्याचा अंदाज सर्वसामान्य नागरीकांना आलेला आहे. म्हणून संबधित प्रशासनातील अधिकारी, जनमाहिती अधिकारी यांचेवर गुन्हे दाखल करण्यात यावा, असे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव, पोलीस निरिक्षक तालुका पोलीस स्टेशन भुसावळ व दीप नगर औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्प १/६६० यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासन उपोषणकर्त्यास न्याय कधी मिळवून देणार ह्या कडे संपूर्ण महाराष्ट्रमधील स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी यांचे लक्ष लागले आहे. जर का त्वरित योग्य तो आदेश झाले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी महाराष्ट्रामध्ये आंदोलन, मोर्चे, उपोषण करतील असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक कांबळे, राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे यांनी महाराष्ट्र राज्य संघटक तथा विश्वस्त योगेश पाटील यांच्यामार्फत दिलेला आहे. याची गांभीर्याने नोंद प्रशासनाने घ्यावी.







