निवडणुक आली की जनता आठवणाऱ्यांपासून सावध रहा – नितीन कांडेलकर

jansanwad yatra ncp

जनसंवाद यात्रेचा अकरावा दिवस :
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरातील दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील १८२ गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांसमवेत संवाद साधण्यासाठी रोहिणीताई खडसे यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट पासून राष्ट्रवादी काँग्रेस जनसंवाद यात्रा सुरू केली आहे यात्रेला पहिल्या टप्प्यात बोदवड तालुक्यातील गावांमध्ये प्रचंड प्रतिसाद लाभला. आता मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा परिसरात यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून यात्रेच्या अकराव्या दिवशी रोहिणी खडसे यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून धामणगाव तांडा, धामणगाव, बोरखेडा जुने, बोरखेडा नवे, मोरझिरा,थेरोळा, कोऱ्हाळा ,पिंप्राळा येथे ग्रामस्थां समवेत संवाद साधून त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

 

rohinitai-khadseयाप्रसंगी रोहिणीताई खडसे यांनी आ एकनाथराव खडसे यांचे कार्यकाळात या मतदार संघात झालेल्या अनेकविध विकास कामांचा पाढा वाचला. त्यात प्रामुख्याने मलकापूरला जवळच्या मार्गाने जोडणारा धुपेश्वर पूल परिसरासाठी फार मोठी उपलब्धी असल्याचे स्पष्ट करून पाटबंधारे मंत्री असताना नाथाभाऊनी परिसर सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी कुऱ्हा वढोदा उपसा सिंचन योजनेस दिलेली मंजुरी या दोन्ही कामांचा उल्लेख केला. सत्तेत नसल्याने पुरेसा निधी न मिळाल्याने ही योजना अपूर्ण असली तरी ती योजना भाऊच पूर्ण करू शकतील असा विश्वास रोहिणीताईनी व्यक्त केला. नाथाभाऊ यांच्या माध्यमातून कुऱ्हा परिसरातील प्रत्येक गावाला चहुबाजूंनी डांबरी रस्त्याने जोडण्यात आले प्रत्येक गावात सामाजिक सभागृह,बुद्धीविहार, अंतर्गत काँक्रीटीकरण ,पाणी पुरवठा योजना, रुग्णालय व विविध विकास कामे करण्यात आले. हे करत असताना त्यांनी कधी जातीयवाद केला नाही. त्याची परतफेड म्हणून हा परिसर प्रत्येक वेळी नाथाभाऊ यांच्या पाठीमागे उभा राहिला. परंतु गेले तीन वर्षांपासून आपल्या परिसराचा विकास खुंटला आहे. आता नाथाभाऊ हे विधानपरिषदेत गेले आहेत त्यांच्या आणि रविंद्रभैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अपूर्ण विकास कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल असे आश्वासन रोहिणी ताई खडसे यांनी उपस्थितांना दिला.

 

गेले तीस वर्षे नाथाभाऊंनी भाजप वाड्या वस्त्यांवर पोहचवला परंतु भाजपने नाथाभाऊ यांच्यावर अन्याय केला परंतु शरद पवार साहेब यांनी नाथाभाऊ यांना विधानपरिषदेत पोहचवले त्यामुळे आता आपल्याला विकास कामांची चिंता नाही परंतु आपल्या सर्वांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवायचा आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद व्हा, असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले तसेच जनतेने आतापर्यंत नाथाभाऊ ,रविंद्र भैय्या पाटील यांना जसे आशिर्वाद दिले तसे प्रेम आशीर्वाद आपल्याला मिळावा असा आशावाद व्यक्त केला

 

rohini khewalkarआपले मनोगत व्यक्त करताना विशाल महाराज खोले हे म्हणाले “मुक्ताईनगर मतदारसंघ हा दिग्गज लोकांनी नेतृत्व केलेला मतदारसंघ आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा ताई पाटील, हरी भाऊ जवरे, प्रल्हादाराव पाटील, रवींद्र भैय्या साहेब पाटील आणि तब्बल तिस वर्ष एकनाथराव खडसे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे.नाथाभाऊंच्या कालखंडात या मतदारसंघात शांतता अबाधित होती. कोणताही जातीय वाद झाला नाही,परंतु गेल्या तीन वर्षांपासून या मतदारसंघात द्वेषाचे, जातीपातीचे राजकारण सुरू झाले आहे गुंडगिरी, दादागिरी वाढली आहे. जनतेला या गोष्टींचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने कोविड काळात कुऱ्हा येथे कोविड केअर सेंटर व्हावे अशी मागणी केली त्यावर नाथाभाऊ यांनी प्रशासनाची चर्चा करून कुऱ्हा येथे कोविड केअर सेंटर मंजूर करून आणले रोहिणी ताई खडसे यांनी त्या कोविड केअर सेंटर साठी बेड आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या इतर दानशूर व्यक्तींनी सुद्धा मदत केली लोकसहभागातून उभे राहिलेल्या कोविड सेंटरच्या माध्यमातून रुग्णांची सोय झाली, मतदार संघात नाथाभाऊनी घेतलेला जनसेवेचा वसा यापुढे रोहिणीताईच यापुढे समर्थपणे पेलू शकतात, असा विश्वास विशाल महाराज खोले यांनी संवाद यात्रेप्रसंगी आयोजित कॉर्नर सभेत व्यक्त केला.

 

नितीन कांडेलकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे झाली नाथाभाऊ यांनी या भागाला जिल्हा परिषदेचा पाच वर्षे लालदिवा दिला परंतु ज्यांना दिवा दिला त्यांनी नाथाभाऊ यांना दगा दिला लाल दिवा मिळाल्यावर सुद्धा त्यांनी सामान्य जनतेला ,समाजाला वाऱ्यावर सोडले कोणतेही काम केले. निवडणूक आली की त्यांना समाज आठवतो परंतु जनता आता सजग झाली आहे गोड बोलणाऱ्या पासून सावध राहा असे त्यांनी आवाहन केले

 

jansanvad

 

डॉ बी.सी. महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले आता कोणतीही निवडणूक नाही, रोहिणी ताई या निवडणून आलेल्या लोकप्रतिनिधी नाही परंतु आपल्या हक्काच्या लोकांसोबत संवाद साधावा त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घ्याव्या यासाठी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून रोहिणीताई खडसे या आपल्या पर्यंत आल्या आहेत. नाथाभाऊंनी गेले तिस वर्ष विकासाचे राजकारण केलेआहे त्यांचा वारसा घेऊन रोहिणी ताई या वाटचाल करत आहेत. निवृत्ती पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले गेले तिस वर्ष एकनाथराव खडसे यांनी सर्व जाती धर्माला न्याय देऊन राजकारण केले. दुर्गम भागात विकासाची गंगा पोहचवली गेले तीन वर्षा पासून विकास थांबलाआहे परंतु एकनाथराव खडसे हे विधानपरिषदेचे आमदार झाले आहेत त्यांच्या माध्यमातून रोहिणीताई खडसे या पाठपुरावा करून राहिलेले विकास कामे पूर्ण करण्याचा पर्यंत करतील

 

jansawad-yatra-muktainagarयावेळी यात्रेत यात्रा प्रमुख ईश्वर राहणे ,निवृत्ती पाटील,पवनराजे पाटील,दशरथ कांडेलकर, विकास पाटील , रंजनाताई कांडेलकर,छाया ताई सवळे,माणिकराव पाटील,डॉ. बी.सी.महाजन,नितीन कांडेलकर,रवींद्र दांडगे,शिवा पाटील,रणजित गोयनका,अतुल पाटील, पवन पाटील डी ओ पाटील,गजानन पाटील, गोपाळ पाटील,सोनू पाटील नंदकिशोर हिरोळे ,मधुकर गोसावी, रवी पाटील,पुंडलिक कपले,गजानन पाटील, मधुसूदन टावरी,मुन्ना बोंडे, नितेश चव्हाण,भैया कांडेलकर,सुशिल भुते,दिलीप पाटील,शांताराम इंगळे, मनोहर निंबाळकर,नरसिंह चव्हाण,सुनिल झाबरे,चेतन राजपुत,सेफुला ठेकेदार,हनिफ ठेकेदार,छगनलाल राठोड निंबाजी चौधरी, हरलाल राठोड ,भागवत बोंबटकार ,रुपचंद गवळे,विशाल रोठे, उद्धव महाजन, संदिप पाटील,संदिप पाटील, भूषण धनगर,संदीप पाटील ,मयुर साठे,अक्षय गव्हाळे, भुषण सोनवणे,प्रविण दाणे, ज्ञानेश्वर ढगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी धामणगाव तांडा येथील अंबादास चव्हाण, जयराम चव्हाण, बापू कटोने,मनोज इटावल, दयाराम बेलदार, रामेश्वर जाधव, अनिल चव्हाण, शांताबाई चव्हाण, अनुसायाबाई चव्हाण, कोकिळा बाई बेलदार, पंचफुला बाई बेलदार आदीची तर मोरझिरा येथील अशोक मोहिते,गुड्डू पवार, अप्पा राठोड, बावा, देवेंद्र चव्हाण,अर्जुन राठोड, सुपडू राठोड, रेखाबाई मोहिते, कौशल्याबाई राठोड, प्रेम चव्हाण ,नानेश्वर निशानकर ,नावदेव नाईक,गजानन राठोड, मोरसिग वाघ इ.

 

धामणगाव येथील हरलालभाऊ राठोड, नामदेवभाऊ राठोड, अजय बागल, ममताभाऊ राठोड,हनिफ खान, निंबाजी चौधरी, चुन्नीलालजी राठोड,नितेशभाऊ राठोड,विवेकभाऊ पांडे,अशोकभाऊ बोराखेडे,राजूभाऊ पाटील, शेख बिस्मिल्ला, सुखदेव मोरे,मंगेश कदम ,एजाज बेग, मीराबाई राठोड,सुलोचना ताई चौधरी,जकीया बी इ, नवे बोरखेडा येथीलमेगराज जाधव , दिलीप पाटील, विनोद मुंडे,मुक्तार भाई ,गुलाब मुंडे,महमूद खान ,किशोर कोले , बंडू पाटील,बबलू पाटील, महेंद्र मुंडे,जनार्दन वाकोडे ,देवानंद इंगळे,प्रमोद मुंडे,कलदर शाह इ.

 

जुने बोरखेडा येथील लक्ष्मण पाटील ,साहेबराव पाटील ,संतोष चव्हाण, ममराज पवार,रसाल पवार,गजानन पाटील, शालीग्राम पाटील, रामेश्वर पिगळे,तुकडू पवार,रामधन पाटील,ओंकार चव्हाण,लक्षण पिगळे, नवलसिग चव्हाण,रमेश चव्हाण,वसराम जाधव, वसराम चव्हाण, अर्जुन राठोड,सुरीलाबाई पवार,शांताबाई चव्हाण,शमीबाई चव्हाण थेरोळा येथील रामधन वाघ,नीना गरड, भाऊराव बेलदार,गजानन पाटील,रामेश्वर पाटील, महादेव बेलदार,माणिकराव इंगळे,पंढरी बजरे, राजू गरड, भरत पाटील,गजानन माडोकर,सुनील तलवारे,सुपळा तायडे, भागवत वाघ,गणेश पाटील,हरीश वाघ,दादाराव मेहंगे,निवृत्ती पांडे,विशाल तलवारे,योगेश कांडेलकर, पिंप्राळा येथील विष्णू झाल्टे,काशीनाथ घाईट,रामभाऊ झाल्टे ,जानराव नारायण झाल्टे,एकनाथ जयदेव झाल्टे,राजाराम पाटील,किसन कहाते, मनोहर कांडेलकर, अजय रुपचंद झाल्टे,श्रावण झाल्टे, विठ्ठल झाल्टे, राधाताई झाल्टे, लताताई झाल्टे, पल्लवी ताई झाल्टे,शुभांगीताई झाल्टे,विद्या ताई झाल्टे,जयश्रीताई झाल्टे,सरलाताई झाल्टे,लताबाई झाल्टे,दुर्गाताई झाल्टे,वंदनाताई झाल्टे,भाग्यश्रीताई धाडे, कोऱ्हाळा येथील नितीनभाऊ कांडेलकर, संतोषभाऊ कांडेलकर, प्रवीणभाऊ कांडेलकर ,धनराज कांडेलकर, अनंता कांडलकर, वामन धांडे, अनिल धांडे ,सागर सुरडकर, गोविंदा थेरोकार ,संजय कांडेलकर, आकाश इंगळे, सुनील धांडे, गजानन धांडे ,सिताराम कांडेलकर, गजानन कांडेलकर , हरिदास थेरोकार, प्रमोद झाल्टे,सतीश वानखेडे, आनंद वानखेडे, अंबादास सुशील, बाजीराव काळे, बाळू पाटील ,राजू भाऊ शंकर भाऊ,मंगेश निशाणकर, मुकुटराव इंगळे, कैलास सुरडकर, अजाबराव सुरळकर ,जयराम पाटील, ज्ञानदेव झाल्टे, समाधान काळे ,रमेश कांडेलकर ,कडू कांडेलकर ,रामदास काळे ,अनिल तायडे ,सुशील झाल्टे, विनायक झाल्टे ,देवराज भाऊ, समाधान इंगळे, उदय झाल्टे ,निलेश पाटील, नंदू झाल्टे, बाजीराव काळे, विलास काळे ,अंबादास भाऊ ,काशिनाथ मोरे, दिलीप खंडारे ,अशोक खंडारे, विठ्ठल कांडेलकर ,भागवत भाऊ, दुर्गाताई कांडेलकर ,रूपालीताई कांडेलकर आदी असंख्य ग्रामस्थांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here