‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यावतीने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’साठी 23 लाख 9 हजारांचा डिमांड ड्राफ्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द

मुंबई (उपसंपादक अनिल साळवी) – ‘कोरोना’च्या लढ्यासाठी ‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यावतीने 23 लाख 9 हजारांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी दिला आहे. बँकचे कार्यकारी संचालक प्रदीप कुमार दास यांच्या हस्ते मदतीचा डिमांड ड्राफ्ट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज सुपूर्द केला. यावेळी बँकेचे मुख्यसरव्यवस्थापक नील लोहित, सरव्यवस्थापक राजकुमार गोविल, प्रादेशिक विभाग प्रमुख अखिलेश मिश्रा उपस्थित होते.
‘कोरोना’ संकटाचा सामना करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’ हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक व्यक्ती, औद्यागिक संस्था, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था पुढे येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजाच्या विविध क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत ‘आयडीबीआय’ बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यावतीने 23 लाख 9 हजार 492 रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here