मुंबई (निवासी संपादक ॲड.डॉ. सुभाष आरोसकर) : दि. १७ सप्टेंबर रोजी देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आपला ७२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास प्रसंगी जगभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा ओघ सुरु आहे.
समाजातील विविध स्तरातील नागरिकांकडून तसेच बॉलिवूड कलाकारांनी देखील नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या पंधरवाड्यादरम्यान भारतीय जनता पार्टी कोकण विकास आघाडी मुंबईच्या माध्यमातून आज (दि.२१) वर्सोवा येथील उच्च प्राथमिक म्युनिसिपल शाळेतील मुख्याध्यापिका सौ.मनिषा अभनावे आणि त्यांच्या सहाय्यक शिक्षिका कांबळी यांना सदगुरू वामनराव पै यांची पुस्तके आणि कॅडबरी चॉकलेट सौ.सुप्रिया सुभाष आरोसकर यांच्या हस्ते देऊन पंतप्रधान मोदींजींचा वाढदिवस साजरा करण्यात आला.







