नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : येथील पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाच्या नेरुळ सेक्टर २३ मधील दारावे गावात असणाऱ्या कार्यालयावर एनआयएने धाड टाकली आहे. एनआयएनचे अधिकारी कार्यालयात मागील सहा तासांपासून तपास करीत आहेत. महाराष्ट्रात २० ठिकाणी ही धाड टाकली आहे.
महाराष्ट्रात २० ठिकाणी ही धाड टाकली आहे. पहाटेच्या कारवाईत एटीएस महाराष्ट्रने औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगाव, जालना, मालेगाव, नवी मुंबई, ठाणे, मुंबई येथे मोठ्या प्रमाणात छापे टाकले आहेत . मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नांदेड येथे आयपीसीच्या विविध कलमांतर्गत (१५३ अ, १२१ अ, १०९, १२० ब), यूएपीए कलम १३(१) (ब) मध्ये समाजात द्वेष पसरवणाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी,कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आतापर्यंत पीएफआयशी संबंधित २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपास सुरू आहे.
दरम्यान, जळगावमधील मेहरूण परिसरातून अकोला एटीएसने तिघांना ताब्यात घेतले असून, एका मशीदीजवळ झोपलेले
असतांना या तिघांना ताब्यात घेण्यात आले. यापैकी दोघांना चौकशीनंतर सोडून देण्यात आले तर एकाला ताब्यात घेण्यात आले. एटीएसने काही दिवसापासून जळगावात लपून बसलेल्या अब्दुल हद्दी अब्दुल रौफ मोमीन (वय ३२ वर्षे, रा. रेहमान गंज वरुन अपार्टमेंट, जालना) याला ताब्यात घेतले असून,. त्याच्याविरुद्ध मुंबई गु.र.नं. २१/२०२२ कलम १२१ ए, १५३ ए, १२० ब, १०९, भा.द.वि.सहकलम १३(१) (ब) युपीए ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल आहे. तसेच अब्दुल हा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआयशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. जळगावच्या पोलीसांनी या कारवाईबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.







