खेलो इंडिया ज्युदो स्पर्धेत मुंबईच्या संपदा फाळकेला कांस्यपदक

sampada-phalke

मुंबई (निवासी संपादक ॲड.डॉ. सुभाष अंकुश आरोसकर) : मेहसाणा, गुजरात येथे झालेल्या पहिल्या खेलो इंडिया वुमन्स लिग, राष्ट्रीय रॅकिंग पश्चिम विभागीय ज्युदो स्पर्धेत मुंबईच्या संपदा फाळकेने सुरेख कामगिरी करत ७८ किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे.

 

वयाच्या १० व्या वर्षापासून संपदा ज्युदो या खेळाचे धडे दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिरात गिरवत आहे. रविंद्र पाटील हे संपदाचे प्रशिक्षक असून, आजवर अनेक स्पर्धांमध्ये संपदाने चमकदार कामगिरी केली आहे. राज्यस्तरीय स्पर्धेत तिने ६ सुवर्ण आणि राष्ट्रीय स्पर्धेत तिने ६ पदकांची कमाई केली आहे.

 

तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तिला सन्मानपत्र देऊन गौरविले होते. संपदा सध्या माटुंगा येथील खालसा कॉलेजात एम.कॉम.चे शिक्षण घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here