चैताली सुकेकर ठरली मिस महाराष्ट्र

chaitali-sukekar

जळगाव (सहसंपादक विवेक खडसे) : राज्यस्तरावरील सौंदर्य स्पर्धा फॉरएव्हर मिस, मिसेस आणि मिस टीन २०२२ सीझन २ फॉरएव्हर स्टार इंडियाने राजस्थानची राजधानी जयपूर येथे आयोजित केली होती. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यात सिन्नर येथील चैताली प्रमोद सुकेकर हिला मिस कॅटेगरीत मिस महाराष्ट्र विनरचा किताब देण्यात आला.

 

कार्यक्रमात विजेत्यांच्या सौंदर्य सोहळ्याबरोबरच गाणे लाँच, एक्टरेस लाँच व डान्स असे इतर उपक्रमही पार पडले. चैतालीला आई, वडील, भाऊ, बहीण याबरोबरच राजेश उपासनीस व नगरसेवक सोमनाथ पावसे यांचे सहकार्य लाभले होते.

 

चैताली गेल्या २५ वर्षांपासून नाशिक येथे वास्तव्यास असली तरी जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारा हे गाव तिचे आजोळ आहे. कौटुंबिक परिस्थिती गरीबीची असतांना, स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर चैतालीने संपादन केलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here