शालेय मुलांना अमली पदार्थ विकणारी महिला अटकेत; बोरिवली एमएचबी पोलिसांची कारवाई

woman-arrested-with-desi-liquor
file photo

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : मुंबई बोरिवली एमएचबी पोलिसांनी बिल्किश खान (वय ५२) नावाच्या महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून २३५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या महिलेला दहिसर पश्चिम येथील शिवाजीनगर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. ही महिला बराच काळ शाळकरी मुलांना ड्रग्ज पुरवत असल्याची माहिती आहे.

 

एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार आल्यानंतर एपीआय सिद्धे यांनी कारवाई केली असून, छाप्यादरम्यान महिलेच्या घरातून २३५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. ही महिला शाळकरी मुलांना बोलावून अमली पदार्थ देत असे, असा आरोप फिर्यादीत आहे.

 

सध्या या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून, तिच्याकडून ड्रग्जही जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here