शिवाजी पार्कवर घुमणार उध्दव ठाकरेंचा आवाज; मुंबई उच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

dasara-melava
file photo

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटाच्यादृष्टीने प्रतिष्ठेच्या झालेल्या दसरा मेळाव्याच्या लढाईत उद्धव ठाकरे गटाची सरशी झाली आहे.मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी शिवसेनेच्या याचिकेवर झालेल्या सुनावणीअंती शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.

 

शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवतीर्थ (शिवाजी पार्क) ही परंपरा आहे. मात्र यंदा शिंदे गटामुळे हा वाद न्यायालयात पोहोचला. या वादावर उच्च न्यायालयात सुरू झालेली सुनावणी शुक्रवारी पूर्ण झाली.

 

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर एकनाथ शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांचा हस्तक्षेप अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेनेच्यावतीने ज्येष्ठ वकील अस्पी चिनॉय यांनी तर शिंदे गटातर्फे ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास बाजू मांडली. मात्र युक्तीवादात शिवसेनेचा युक्तीवाद उच्च न्यायालयाने ग्राह्य धरत शिवसेनेला शिवतीर्थावर दसरा मेळाव्याची परवानगी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here