भरवस्तीत कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या सराईताला खडक पोलिसांनी केले जेरबंद

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : भरवस्तीत कमरेला पिस्तूल लावून फिरणाऱ्या तथाकथित भाईला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई शनिवारी (दि.२४) नेहरू रोडवरील सोनवणे हॉस्पीटलजवळील बसस्टॉप जवळ करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर परिसरात गस्त घालत असताना खडक पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संदीप तळेकर यांना खबर मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी ऋषिकेश उर्फ सोन्या संदीप मंडलिक (वय २६ रा. कोंढवा) हा शस्त्रासह भरवस्तीत वावरत आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सोन्याला ताब्यात घेतले.

 

त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडून पोलिसांनी ६० हजार रुपयांची देशी बनावटीची पिस्तूल व ५ हजार रुपयांचे मॅगझीन ज्यामध्ये पाच जिवंत काडतुसे होती, असा एकूण ६५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक करत आहेत.

ही कारवाई खडक पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव व पोलीस निरीक्षक गुन्हे राजेश तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, राकेश जाधव, पोलीस अमंलदार तेजस पांडे, संदीप तळेकर, विशाल जाधव यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here