सिल्लोड तालुक्यातील गोळेगांव मध्ये अवैध दारू विक्री जोमात; अजिंठा पोलिस प्रशासन मात्र कोमात…

daru-vikri-at-golegaon

गोळेगाव (प्रतिनिधी संजय दांडगे) : सिल्लोड तालुक्यातील गोळेगांव येथे मोठ्या प्रमाणात अलिकडील काळात अवैध धंद्यानी जोर धरला आहे. गोळेगांव येथील गर्दीच्या ठिकाणीही राजरोस पणे हे व्यवसाय चालू असल्याने सर्वसामान्य लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


अवैध धंद्यामुळे तरुणवर्ग मोठ्या प्रमाणात गुरफटला जात आहे.शाळकरी मुलेही याकडे आकर्षित होवू लागल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. तरुण वर्ग कर्जबाजारी तसेच व्यसनाधिन बनत चालल्याने ग्रामस्थामध्ये प्रचंड चीड दिसून येत आहे. पोलीस खात्याचा या व्यावसायिकांवर धाक राहिला नसल्याचे दिसते. गावामध्ये जातीय तेढ निर्माण होऊ शकते. गावातील महिलावर्गातून अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली जात होती.


ग्रामपंचायतीने अवैध धंद्याबाबत आक्रमक भूमिका घेऊन अवैध धंद्याबाबत अजिंठा पोलिस स्टेशनला निवेदन दिले होते परतु त्या निवेदनाला केराची टोपली दाखवली काय? असा प्रश्न ग्रामस्थामधून होत आहे. पोलिस स्टेशनला अनेक वेळा माहीती देऊन सुध्दा अवैध दारू विक्री करणार्‍यावर कारवाई होत नाही पोलिस प्रशासनच त्यांना अभय देताना दिसत आहे पोलिस प्रशासनाने आक्रमक भूमिका घेऊन कारवाई करावी असे ग्रामस्थामधून सुर उमटत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here