मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : कष्टकरी, शेतकरी माता भगिनी युवकांच्या सन्मानासाठी हे ब्रिद वाक्य घेऊन रोहिणी खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या सतराव्या दिवशी रोहिणी खडसे यांनी रावेर तालुक्यातील गाते आणि मोठा वाघोदा येथे ग्रामस्थां सोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या
यावेळी जनसंवाद यात्रेत यात्रा प्रमुख निवृत्तीभाऊ पाटील,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु.डी पाटील सर,विशाल महाराज खोले,जि प सदस्य कैलास सरोदे, रामदास पाटील, पंकज येवले, प स सदस्य दिपक पाटील ,किशोर भाऊ चौधरी,योगिता ताई वानखेडे,रामभाऊ पाटील,सुनिल कोंडे, माया ताई बारी,भरत अप्पा पाटील, अतुल पाटील,प्रदिप बडगुजर,मेहमूद शेख,वाय डी पाटील,गजानन लोखंडे,शशांक पाटील,श्रीकांत चौधरी,योगेश्वर कोळी,सिद्धार्थ तायडे,शाहिद खान,हकीम बागवान,शकील सर, अमिन खान,गोपाळ गंगतिरे,रवींद्र पाटील,किशोर पाटील ,भरत सुपे, कालू मिस्त्री,सोनू पाटील, सचिन महाले,डिगंबर चौधरी, ललित कोळंबे,अतुल पाटील,सोनु पाटील, राजेंद्र चौधरी, नितीन पाटील,,केतन पाटील,वासुदेव चौधरी,केतन पाटील, सुनिल राऊत, उज्ज्वल पाटील,प्रदिप साळुंखे, नंदकिशोर हिरोळे,बाळाभाऊ भालशंकर,चेतन राजपुत,विशाल रोटे,अजय आढायके,भूषण कोळी,शुभम मुर्हेकर, रोहन च-हाटे,या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
रोहिणीताई खडसे यांनी ग्रामस्थांसमवेत संवाद साधताना सांगितले एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून गावागावात अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, गटारे,अंगणवाडी, सभागृह असे नानाविविध विकास कामे झाली. एकनाथराव खडसे हे उच्च तंत्र शिक्षण मंत्री असताना ग्रामीण भागातील महाविद्यालयांना उच्च शिक्षणाची मान्यता देऊन ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना गावात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणावर आय टी आय ची स्थापना केली. ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना शेतीतील नविन तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळावे यासाठी मुक्ताईनगर येथे शासकीय कृषी महाविद्यालयाची निर्मिती केली. अल्पसंख्यांक समाजातील तरुणांना तांत्रिक शिक्षण मिळावे यासाठी मुक्ताईनगर येथे शासकीय तंत्रनिकेतनची स्थापना केली. सावदा परिसरातील रुग्णांना मोफत उपचार मिळावे यासाठी सावदा येथे ग्रामिण रुग्णालयाची निर्मिती केली. सावदा येथे भव्य दिव्य ग्रामिण रुग्णालयाची इमारत पूर्णत्वास येत आहे लवकरच रुग्णांना तिथे उपचाराची सुविधा उपलब्ध होईल. राहिलेली विकास कामे एकनाथराव खडसे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुर्ण करण्यात येतील आम्ही विकास कामांना महत्व देणारे लोक आहोत, पण गेले तीन वर्ष झाले मतदारसंघात गुंडगिरी वाढली आहे. मतदारसंघाचे वातावरण दूषित होत आहे जनसंवादयात्रेत गावागावतील महिला माझ्याजवळ येऊन गेल्या तीन वर्षात गावात दारू विक्री खूप वाढली असून अनेकांचे संसार उध्वस्त होत असून दारू विक्री बंद करण्याबाबतची एकमेव मागणी करत आहेत. याला आळा बसण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी उपस्थितांना आश्वासन दिलेत्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभासद नोंदणी करण्याचे त्यांनी उपस्थित कार्यकर्त्याना आवाहन केले
या प्रसंगी विशाल महाराज खोले यांनी त्यांच्या दमदार भाषणातून नाथाभाऊ ग्रेट लीडर कसे आहेत हे सांगताना मतदार संघातील अनेकविध विकासकामांचा उहापोह केला. पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार साहेब जाणता नेता असल्याचे सांगून यापुढे त्यांचे हात मजबूत करण्यासाठी रोहिणीताईंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.
जनसंवाद यात्रेला गाते येथील गणेश पाटील, विलास चौधरी, आकाश कोळी, योगेश तायडे,संतोष कोळी, सुखदेव तायडे, संतोष पाटील, प्रविण पाटील, प्रभाकर तायडे, गजेंद्र कोळी, भोजराज पाटील, शांता बाई पाटील, सुनंदाताई इंगळे,आशा ताई तायडे, प्रतिभाताई गातेकर,ज्योती ताई झालटे,सुरेखाताई कोळी, वाघोदा बु येथील सरपंच राजु तडवी सर,कालूदादा मिस्त्री, भरत सुपे, शाकीर टेलर,नितीन सुपे,कुंदन सुपे, उत्तम वाघ, रियाज भाई,विलास वाघ, अमिना बाई तडवी, अख्तर खान, बाळू भाऊ महाजन, उत्तम वाघ, नरेंद्र वाघ, शंकर बोदडे, मनोज वाघ, आकाश वाघ, मनोहर झालटे, अमोल वाघ, करन तायडे, कुंदन वाघ, दिपक झालटे, मनोहर वाघ, नकुल वाघ, अजय तायडे, महेंद्र वाघ, गौतम वाघ, अशोक वाघ आदी सह असंख्य नागरिक उपस्थित होते.







